नाशिक येथे चुंबन घेतांना नागाच्या दंशामुळे सर्पमित्राचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – नागाचे चुंबन घेत असतांना त्याने दंश केल्याने सर्पमित्र नागेश भालेराव यांचा मृत्यू झाला. ११ नोव्हेंबर या दिवशी जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका ठिकाणी पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागासमवेत ‘स्टंट’ करतांना नागाने सर्पमित्र नागेश याच्या ओठांना दंश केला. त्यानंतर नागेश बेशुद्ध पडले. त्यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात भरती केले; मात्र संपूर्ण शरिरात नागाचे विष पसरल्याने नागेश यांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.