तुर्कीयेमधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी सीरियातील महिलेला अटक

इस्तंबूल (तुर्कीये) – येथे १३ नोव्हेंबरला झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

ही महिला सीरिया देशातील रहाणारी आहे. तिला ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ या संघटनेने बाँबस्फोट घडवण्याचा आदेश दिला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता.