तुर्कीयेमध्ये झालेल्या स्फोटात ६ जण ठार, तर ८१ जण घायाळ

इस्तंबूल (तुर्कीये) – येथील तकसीम भागात १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी झालेल्या स्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू, तर ८१ जण घायाळ झाले. तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त करत ‘दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’, असे आश्‍वासन दिले आहे.

भारतानेही या घटनेविषयी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या लोकांप्रती आम्ही शोक, तसेच घायाळ झालेल्या नागरिकांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. घायाळ व्यक्ती लवकरात लवकर बर्‍या व्हाव्यात, अशी प्रार्थना आहे,’ असे ट्वीट भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले.