पुणे येथे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ६ गोवंशियांना कत्तलीपासून मिळाले जीवनदान !

पकडण्यात आलेले गोवंश

शिरूर (जिल्हा पुणे) – बजरंग दल शिरूर गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ६ गोवंशियांना कत्तलीपासून जीवनदान मिळाले. या प्रकरणी ३ धर्मांधांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे ! गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते. – संपादक) गोप्रेमी श्री. अमोल बालाजी दुनगे यांनी ९ नोव्हेंबरला दुपारी गोवंश असलेली पिकअप गाडी आळेफाटा येथून नगरच्या दिशेने जातांना पाहिली. त्यांनी प्रतिक उपाख्य नितीन (बजरंग दल गोरक्षा प्रमुख शिरूर) यांना दूरभाषवरून याविषयी सविस्तर माहिती दिली. नितीन यांनी त्वरित शिरूर प्रखंड बजरंग दल संयोजक अजिंक्य तारु आणि बजरंग दलाचे इतर गोरक्षक रवींद्र लक्ष्मण बैनाडे, भूषण मुत्याल, विक्रांत मिसाळ आणि अन्य कार्यकर्ते यांना कळवले. हे सर्व कार्यकर्ते त्वरित नारायणगाव येथे पोचले असता गोवंश असलेली पिकअप गाडी नुकतीच नगरच्या दिशेने गेलेली त्यांना कळले.

बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांसमवेत

गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग करून दुपारी १ वाजता जातेगाव शिवारात हॅाटेल साईदर्शनजवळ गाडी अडवून ती पडताळली असता गाडीमध्ये दोन गायी आणि चार वासरे बांधलेल्या अवस्थेत दिसली. चालकाकडे विचारपूस केली असता त्याने गाडीतील ६ गोवंश विकत घेऊन जेऊर येथील पशूवधगृहात सोडण्यासाठी जात आहे, असे सांगितले, तर इतरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गोरक्षकांनी पोलिसांना याचा माहिती दिल्यावर आरोपी शहानुर रहेमान सय्यद, असिफ शब्बिर शेख, सकलिन असिफ कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका 

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही गोवंशाच्या तस्करीच्या घटना घडणे पोलिसांना लज्जास्पद !