भारतियांनो, धोक्याची घंटा वाजली आहे…! आतातरी जागे व्हा !

१. मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यास भारताला इस्लामीकरणाचा किंवा दुसर्‍या फाळणीचा धोका !

‘अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापिठाने केलेल्या एका अभ्यासानुसार, देशात मुसलमानांची लोकसंख्या जेव्हा १६ टक्के होते, तेव्हा त्या देशाला भविष्यात इस्लामी देश होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. या सिद्धांताच्या पुराव्यासाठी विद्यापिठाच्या इतिवृत्तात (अहवालात) काही देशांची उदाहरणेही देण्यात आली आहेत. सध्या भारतात मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २० कोटी म्हणजे जवळपास १५ टक्के आहे. ‘हम पाँच हमारे पच्चीस’ याच प्रमाणात मुसलमानांची संख्या वाढत राहिली, तर येत्या काही वर्षांतच त्यांची संख्या १६ टक्के होऊन भारतासमोर इस्लामीकरण किंवा दुसर्‍या फाळणीचे संकट उभे राहू शकते.

२. मुसलमानबहुल भागात त्यांच्याकडून अल्पसंख्यांकांना देण्यात येणारे ३ निर्णायक पर्याय !

हॉवर्ड विद्यापिठाच्या अभ्यासपूर्ण इतिवृत्तात (अहवालात) इतर जाणसाळीव्यतिरिक्त (माहितीविना) मुसलमान ज्या देशात २, ५, ८, १०, १५ अशा टक्केवारीच्या प्रमाणात असतात, तिथे त्यांची वागणूक कशी असते ?, ती १६ टक्के झाल्यानंतर त्यांच्या वागणुकीत कसा पालट होतो ?, हे दर्शवण्यासाठी जगातील अनेक देशांची उदाहरणे देण्यात आली आहेत. जेव्हा मुसलमानांची लोकसंख्या ८० ते ९० टक्के होते, तेव्हा काय घडते ?, याचा रक्तरंजित अनुभव आपण वर्ष १९४८ मध्ये आणि नंतर काश्मीरमध्ये वर्ष १९९० मध्ये घेतला आहे. अशा भागात तेथील मुसलमान अन्य धर्मीय अल्पसंख्यांकांसमोर केवळ तीनच पर्याय ठेवतात. एक म्हणजे धर्मपरिवर्तन करून इस्लाम पंथ स्वीकारा, दुसरा म्हणजे जिवंत रहायचे असेल, तर स्वतःची संपत्ती, तरुण स्त्रिया आणि मुली आमच्या स्वाधीन करून निमूटपणे निघून जा. अन्यथा तिसर्‍या पर्यायानुसार मरणाला सामोरे जा ! अशा निर्णायक क्षणी संख्येने अत्यल्प असलेले सज्जन मुसलमान गप्प बसतात किंवा निरुपायास्तव कट्टरतावाद्यांच्या सुरात सूर मिळवतात.

श्री. शंकर गो. पांडे

३. हिंदुस्थानवर सत्ता प्रस्थापित करणे हाच मुसलमानांचा आधार असणे

लोकसंख्येच्या आधारावर भारताला इस्लामी देश बनवण्याचे स्वप्न पाकिस्तान त्याच्या निर्मितीपासूनच पहात आला आहे; म्हणूनच पाकिस्तान आणि भारतातील पाकिस्तानवादी मुसलमान यांच्याकडून ‘लढके लिया पाकिस्तान हसके लेंगे हिंदुस्थान’ अशी घोषणा नेहमीच दिली जाते. हसत हसत हिंदुस्थानवर सत्ता प्रस्थापित करण्याचा त्यांचा आधार अर्थात् भारतातील मुसलमानांची झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या हाच असतो.

४. ‘मुसलमान त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर भारताला इस्लामी देश करतील’, असे पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी सांगणे

आपल्या देशातून जीव वाचवण्यासाठी पळून गेलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी एकदा सार्वजनिकरित्या सांगितले होते, ‘‘पाकिस्तानचे भारताविरुद्ध लढण्याचे प्रमुख अस्त्र हे अणुबाँब नसून भारतातील मुसलमानांची वाढती लोकसंख्या हेच आहे. भारतातील मुसलमान त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर भारताला एक दिवस इस्लामी देश करतील. भारत पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकू शकतो, श्रीराममंदिर बांधू शकतो, काश्मीरचे ३७० कलम हटवू शकतो; पण भारत स्वतःला इस्लामी देश होण्यापासून वाचवू शकणार नाही. पाकिस्तानची खरी शक्ती भारतातील मुसलमानांची वाढती लोकसंख्या हीच आहे.’’

५. हिंदूंविरुद्ध गरळ ओकणारा वारीस पठाण याला न रोखणारे असदुद्दीन ओवैसी यांचे भारतद्वेषी रूप उघड !

एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी तर नेहमीच भडकाऊ भाषा वापरून संपूर्ण भारतभर मुसलमान समाजाला चिथवण्याचे एकमेव कार्य करत असतात. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, श्री. अमित शहा आणि हिंदू यांचा द्वेष त्यांच्या प्रत्येक शब्दामधून व्यक्त होतो. बेंगळुरू येथे झालेल्या त्यांच्या सभेत अमूल्या लिओना या तरुणीने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तेव्हा ओवैसीने तिला रोखण्याचे संशयातीतपणे (बेमालूमपणे) नाटक केले; पण त्याच सभेत हिंदूंविरुद्ध गरळ ओकणारा वारीस पठाण याला रोखण्याचा त्यांनी थोडाही प्रयत्न केला नाही. करणार तरी कशाला ? कारण वारीस पठाण जे बोलले, ते ओवैसी यांचेच मनोगत होते. एम्.आय.एम्.च्या सभेतच ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा का दिल्या जातात ? याचे उत्तरही स्पष्ट आहे. ओवैसींच्या सभेला हिंदुस्थानप्रेमी येतीलच कशाला ? अशा सभेला जमणार्‍यांच्या मनातही पाकिस्तानच असतो.

६. मुसलमानांच्या वास्तूंचा उदोउदो करणारे असदुद्दीन ओवैसी यांनी सत्य जाणून घ्यावे !

‘आपण कधीकाळी या देशाची राज्यकर्ती जमात होतो’, या विचारांचा पगडा अद्यापही ओवैसींच्या मनावर आहे. त्यातून बाहेर पडण्याची त्यांची मानसिकता आणि सिद्धताही नाही; म्हणूनच मागील एका सभेत ते उद्दामपणे बरळले होते, ‘‘आमच्या पूर्वजांनी भारतावर ८०० वर्षे राज्य केले. त्यांनी ताजमहल, कुतुबमिनार, चारमिनार, लाल किल्ला अशा वास्तू बनवल्या. तुमच्या पूर्वजांनी काय केले ?’’ ओवैसींनी ज्या वास्तूंचा मुसलमानांच्या वास्तू म्हणून उल्लेख केला आहे, त्या मूळ हिंदूंच्याच वास्तू असून मुसलमान आक्रमकांनी अतिक्रमित केलेल्या आहेत. भारतात मुसलमान राज्यकर्त्यांनी नवीन बांधकाम अत्यल्प; पण पाडकाम आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले आहे. पु. ना. ओक आणि अन्य अनेक इतिहासकार यांनी याची शेकडो उदाहरणे पुराव्यांसहित दिली आहेत.

७. मंदिरांचे सौंदर्य !

काही मुसलमान इतिहासकारांच्या पुस्तकातूनही मंदिरांच्या विध्वंसाचा इतिहास दिला गेला आहे. मुसलमानांच्या विध्वंसक दृष्टीतून सुटलेली आजही हिंदूंची भव्य आणि अप्रतिम शिल्पकृतींनी नटलेली सहस्रो मंदिरे अन् वास्तू आहेत की, ज्यांचे सौंदर्य कलंकित इतिहास असणार्‍या ताजमहालाला चपराक देणारे आहे.

८. ओवैसी महाशयांनी स्वतःच्या घोर अज्ञानाचे सार्वजनिक प्रदर्शन करू नये !

जेव्हा इस्लामची निर्मितीही झाली नव्हती, त्याच्या आधी लक्षावधी वर्षांपूर्वी भारतातील हिंदूंनी केवळ शिल्पशास्त्रच नव्हे, तर साहित्य, संगीत, कला, विज्ञान, गणित, भौतिक, अंतराळ, ग्रहगोल, विमान, नौकायन, शस्त्र, अस्त्र, वस्त्र, कृषी, औषधी, शरीरशास्त्र, शिक्षण, धर्म, अध्यात्म अशा एक नव्हे, तर शेकडो शास्त्रांत मूलभूत संशोधन करून प्रगतीचे अत्युच्च शिखर गाठले होते. त्यामुळे ओवैसींनी हिंदूंना ‘तुमच्या पूर्वजांनी काय केले ?’, असा मूर्खपणाचा प्रश्न विचारून स्वतःच्या अज्ञानाचे सार्वजनिक प्रदर्शन करू नये.

९. शाहीनबाग आंदोलन आणि त्यामागील सत्य !

मुसलमान नेत्यांच्या भडकावू भाषणांमुळेच अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या देहलीतील शाहीनबाग आंदोलनाचा भडका उडाला आणि त्यात ३८ जणांचे जीव जाऊन कोट्यवधी रुपयांची साधनसंपत्ती (मालमत्ता) आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्यांना ‘सी.ए.ए.’चा (नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा) अर्थही समजला नाही, असे सहस्रो मुसलमान पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलेसुद्धा हातात राज्यघटना अन् तिरंगा घेऊन भाषा मात्र पाकिस्तानचीच बोलत होते.

१०. भारतातील बहुसंख्य मुसलमानांचे स्वप्न

मुसलमान समाजाचा सी.ए.ए. आणि एन्.आर्.सी.ला असलेल्या विरोधाचा स्पष्ट अर्थ असा आहे की, भारताने इस्लामी राष्ट्रातील पीडित अशा हिंदु बौद्ध, जैन, शीख, पारशी, ख्रिस्ती यांना भारताचे नागरिकत्व न देता तसेच मरू द्यावे; पण भारतात अन्य देशांतून घुसलेले बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या यांना मात्र भारतात मुक्तपणे राहू द्यावे, त्यांना भारताचे नागरिकत्वही द्यावे आणि भारताला मुसलमानबहुल करण्याचे त्यांचे स्वप्न साकार होऊ द्यावे.

लोकसंख्येच्या आधारावर या देशाचे इस्लामीकरण करणे हे केवळ मुसलमान नेत्यांचेच नव्हे, तर भारतातील बहुसंख्य मुसलमानांचेही स्वप्न आहे. हे वास्तव दुर्दैवी असले, तरी सत्य आहे. बहुतांश मुसलमानांची पहिली निष्ठा ही स्वतःचा धर्म, धर्मबंधू आणि नंतर देश यांवर असते. यामुळेच त्यांची मानसिकता कट्टरतावादी असते.

११. मुसलमानांच्या कट्टर मानसिकतेचे दर्शन घडवणारी उदाहरणे

अमेरिकेतील स्त्री-पुरुष समान अधिकाराची (हक्क) पुरस्कर्ती, प्रसिद्ध, विद्वान लेखिका आणि राजकारणी अयान हिरसी म्हणते, ‘‘प्रत्येक मुसलमानाच्या हातात शस्त्र नसेलही; पण त्याची विचारसरणी कट्टरतावादीच असते. मग तोंडाने तो कितीही बंधुत्वाच्या वल्गना (गप्पा) करत असो.’’ भारताच्या संबंधांत मुसलमानांच्या कट्टर मानसिकतेचे दर्शन घडवणारी शेकडो उदाहरणे देता येतील; पण मोजकीच देतो.

अ. शाहीनबागच्या आंदोलनातील आंदोलकांची वक्तव्ये हे यातील एक उदाहरण आहे.

आ. वर्ष १९९३ मध्ये शेकडो निष्पाप लोकांचे प्राण घेणारा मुंबई बाँबस्फोटातील एक मुख्य आरोपी याकूब मेनन याला नागपूर येथील कारागृहात ३० जुलै २०१५ या दिवशी फासावर चढवण्यात आले होते. मुंबई येथे निघालेल्या त्याच्या अंत्ययात्रेत ५ लाखांपेक्षा अधिक मुसलमान उपस्थित होते.

इ. ८ जुलै २०१६ या दिवशी काश्मीरमधील क्रूर आतंकवादी बुरहान वाणी मारला गेला, तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेतही मुसलमानांचा अपार जनसागर लोटला होता.

ई. ३ जानेवारी २०२० या दिवशी इराणचे जनरल कासम सुलेमानी यांना अमेरिकेने आपल्या इराकमधील सैनिकी तळावरून ड्रोनद्वारे आक्रमण करून ठार केले होते, तेव्हा इतर देशांतील मुसलमान शांत होते; पण काश्मीरमधील मुसलमानांनी मोर्चा काढून त्यात अमेरिका आणि इस्रायल यांच्याविरोधी घोषणा दिल्या.

उ. २७ जुलै २०१५ या दिवशी भारतरत्न आणि भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे शिलाँग येथे निधन झाले, तेव्हा तमिळनाडूतील रामनाथपुरम् येथे झालेल्या त्यांच्या अंत्यविधीला मुसलमानांची संख्या केवळ ५०-६० इतकीच होती. एकूणच काय, तर मुसलमानांना देशभक्त मुसलमानांपेक्षा कट्टर मुसलमानांचे आकर्षण अधिक आहे.

१२. भारताची स्थिती सिरियापेक्षाही वाईट होईल, हे कटू सत्य !

प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार तारिक फतेह म्हणतात, ‘‘पाकिस्तानची खरी शक्ती तेथील लष्कर आणि आय्.एस्.आय्. नाही, तर भारतातील कट्टरतावादी मुसलमान आहेत. ते भारताला मदरसे, मशिदी, बाँबस्फोट, आतंकवाद, लोकसंख्यावाढ इत्यादी माध्यमांतून पोखरत आहेत. बाहेरच्या पेक्षा भारताला आतूनच अधिक धोका आहे. भारतात प्रत्येक मुसलमान जोडप्याला मग तो सुशिक्षित असो वा अशिक्षित असो, प्रत्येकाला १० ते १२ मुले आहेत. त्यांच्यासाठी कुटुंबनियोजनाचा कायदा अनिवार्य केला नाही, तर भारताची स्थिती सिरियापेक्षाही वाईट होईल.’’

तारिक फतेह हे निर्भीडपणे, तसेच नेहमी कटू; पण सत्य बोलतात. त्यामुळे ते मुसलमानांमध्ये अप्रिय आहेत. मुसलमान नेते असोत वा शाहीनबागचे आंदोलनकर्ते असोत, या सर्वांचे वर्तन आणि वक्तव्य यांतून भारतीय मुसलमानांच्या मनातील सुप्त इच्छा-आकांक्षांचे सार्वजनिक प्रकटीकरण झाले आहे. धोक्याची घंटा वाजली आहे. प्रश्न असा आहे की, घोर निद्रेत असणार्‍या हिंदु समाजाच्या कानात या घंटेचा नाद कधी शिरणार आणि तो या निद्रेतून कधी जागा होणार ?

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.