प्रत्येक हिंदूपर्यंत ‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राची माहिती पोचवून हा जिहादी प्रयत्न रोखण्याची आवश्यकता ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हलाल जिहाद’ विषयावर व्याख्यान !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने साजरा करण्यात आलेला दीपोत्सव

सोलापूर, १० नोव्हेंबर (वार्ता.) – हलाल प्रमाणपत्रामुळे हिंदूंच्या व्यवसायाला खीळ बसत आहे. त्यामुळे भारताच्या अखंडत्वाला सर्वांत मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रत्येक हिंदूपर्यंत हलाल जिहादच्या षड्यंत्राची माहिती पोचवून हा जिहादी प्रयत्न रोखण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी केले. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रंगभवन येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आयोजित ‘हलाल जिहाद’ या विषयावरील व्याख्यानात श्री. पिसे बोलत होते.

श्री. दत्तात्रय पिसे

या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रेरणामंत्राने करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी १ सहस्र पणत्या लावण्यात आल्या होत्या. ध्येयमंत्राने दीपोत्सवाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. व्याख्यान झाल्यानंतर अनेकांनी श्री. दत्तात्रय पिसे यांच्याकडून हलाल प्रमाणित उत्पादनांची माहिती जाणून घेतली, तसेच ‘हलाल प्रमाणित उत्पादने आम्ही विकत घेणार नाही’, असे सांगितले.

२. उपस्थितांनी ‘शहरातील प्रमुख २ व्यापारी संघटनांमध्ये ‘हलाल जिहाद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.

३. हिंदु खाटिक व्यवसायातील कार्यकर्त्याने सांगितले की, या हलाल प्रमाणपत्रामुळे आमचा व्यवसाय नष्ट झाला आहे. त्यामुळे अन्य हिंदु व्यावसायिकांनीही हलाल षड्यंत्र रोखण्यासाठी सावध होणे आवश्यक आहे.