पुणे – एफ्.आर्.पी. (फिक्स्ड रिझर्व्ह प्राईस ) म्हणजेच राखीव किंमत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील अलका चौक ते साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक नेत्यांसह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील सहस्रो शेतकरी सहभागी झाले होते. २ वर्षांत साखरेच्या किमतीमध्ये वाढ केली नाही; मात्र यंदा तरी साखरेच्या किमतीत वाढ झाली पाहिजे, अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून शेतकर्यांनी केली. सरकारकडून आमच्या मागण्यांसाठी काहीही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद मिळत नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री. राजू शेट्टी यांनी या वेळी केली.