‘हलाल शो इंडिया’ रहित करण्यासाठी पोलीस आणि इस्लामिक जिमखान्याचे व्यवस्थापक यांना निवेदन !

हलाल सक्तीविरोधी कृती समितीचा प्रयत्न !

मुंबई, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबईत ‘हलाल शो इंडिया’ कार्यक्रमाला अनुमती देऊ नये, यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी हलाल सक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने मरिन लाईन्स पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यासह ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता, त्या इस्लामिक जिमखान्याच्या व्यवस्थापकांनाही कार्यक्रमाला अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी हलाल सक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिषेक मुरुकटे उपस्थित होते.