पू. जयराम जोशी (वय ८४ वर्षे) आणि पू. पद्माकर होनप यांच्या भेटीतील अनुभवलेला भावानंद !

पू. जयराम जोशीआजोबा

‘सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) आणि त्यांचे कुटुंबीय काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात वास्तव्यास आले होते. २६.१०.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पू. होनपकाका आणि पू. जयराम जोशी (आबा) यांची भेट झाली. त्यांच्या भेटीच्या वेळी दोघांच्या नेत्रांतून सतत भावाश्रू येत होते. त्या दोघांना एकमेकांकडे पाहिल्यावर आपले जवळचे कुणी भेटल्यानंतर जसा आनंद होतो, तसा आनंद जाणवत होता. त्या वेळी त्यांच्यामध्ये पुढील संवाद झाला.

पू. जोशीआबा : मी रामनाथी आश्रमात असतांना मला तुमचा सहवास पुष्कळ लाभला होता. आज मला तुम्हाला पाहून पुष्कळ आनंद झाला.

पू. होनपकाका : आता काय आमचा परतीचा प्रवास ! जातांना आनंदाचे फवारे उडवत जायचे !

हे सांगताना पू. होनपकाकांना पुष्कळ भरून येत होते. त्या वेळी दोघांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम पाहून तिथे उपस्थित असणार्‍या साधकांचा भाव जागृत झाला.’

– श्री. योगेश जोशी (पू. जयराम जोशी यांचा मुलगा), सनातन आश्रम, मिरज. (३१.१०.२०२२)