२ धर्मांधांवर गुन्हा नोंद
सोलापूर – सोलापूर आणि इंदापूर भागात वाढत्या गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी ‘गोरक्षा दल महाराष्ट्र राज्य’च्या गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने धडक कारवाई चालू केली आहे. याअंतर्गत कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) आणि इंदापूर (जिल्हा पुणे) येथे केलेल्या २ वेगवेगळ्या कारवायांमध्ये १० देशी गोवंशियांची सुटका करण्यात आली. या वेळी एक गोवंश कापलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाणे येथे मोसीन शौकत कुरेशी आणि शमशुद्दीन सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोतस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हे गोवंशीय शेतकर्यांचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमध्ये सर्वश्री ऋषिकेश कामथे, राहुल कदम, अक्षय कांचन, पंकज काकडे, निखिल तेलकर, प्रतीक कांचन आणि सुधीर बहिरवडे यांनी परिश्रम घेतले, तसेच स्थानिक पोलीस अधिकारी विक्रांत बोधे यांनी सहकार्य केले. इंदापूर येथून सुटका केलेल्या ५ गोवंशियांना निरा-नरसिंगपूर येथील गोशाळेत सोडण्यात आले आहेत, तसेच कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) येथून सुटका केलेल्या गोवंशियांना मोडनिंब येथील श्रीकृष्ण गोशाळेत सोडण्यात आले आहेत.