हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियानात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

हिंदूंनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त लावले घरोघरी दीप !

दीपासमवेत भगवा झेंडा लावून सहभागी होतांना सांगली येथील धर्मप्रेमी

मुंबई – ७ नोव्हेंबर या दिवशी असणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी घरोघरी दीप लावण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. या अभियानात देशभरातील हिंदूंनी उत्स्फूर्त सहभागी होत आपापल्या घरासमोर दीप लावले. या अभियानात धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनेकांनी या अभियानाचे छायाचित्र काढून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आणि इतरांनाही त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या संदर्भात ट्विटरवर #Ek_Deep_HinduRashtra_Ka’ हा हॅशटॅग वापरून ट्रेंडही राबवण्यात आला.

वाई (सातारा) येथे अभियानात सहभागी धर्मप्रेमी महिला
मिरज (सांगली जिल्हा) येथे श्री दुर्गामाता मंदिर येथे धर्मप्रेमी महिला एकत्र येऊन अभियान राबवतांना
दीप घेऊन अभियानात सहभागी होणारे मिरज (जिल्हा सांगली) येथील धर्मप्रेमी श्री. उमेश पडियार

संपादकीय भूमिका

हिंदु राष्ट्र स्थापनेचा दीप अधिकाधिक हिंदूंमध्ये प्रज्वलित झाल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही !