जैविक शस्त्रास्त्रांच्या प्रकरणात रशियाला केवळ चीनचा पाठिंबा : भारत तटस्थ

न्यूयॉर्क – रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या आणखी एका ठरावापासून भारताने स्वत:ला दूर ठेवले आहे. वास्तविक जैविक शस्त्रास्त्रांंच्या वापराविषयी युक्रेनकडून मोठा दावा करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाने अमेरिकेच्या साहाय्याने युक्रेनचे सैनिक जैविक शस्त्रांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. रशियाने या प्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून चौकशी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. युक्रेनमधील प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रास्त्रांंच्या वापराची चौकशी करण्यात यावी, असे या प्रस्तावात म्हटले होते. रशियाच्या या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यामध्ये रशियाला केवळ चीनचा पाठिंबा मिळाला. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले, तर भारतासह इतर काही देश या मतदानात भाग घेता तटस्थ राहिले.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या साहाय्याने युक्रेनमध्ये जैविक शस्त्रास्त्रांंचा वापर होत आहे, असा आरोप रशियाने गेल्या आठवड्यात केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी १५ सदस्यीय आयोग स्थापन करण्याची मागणी करणारा एक ठराव रशियाने संमत केला होता.