काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा आणि पुलवामा येथे सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार मारले. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुख्तार भट याचा समावेश आहे. सुरक्षादलांनी त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे. ठार झालेले आतंकवादी सुरक्षादलांच्या तळावर आत्मघाती आक्रमण करण्याचा कट रचत होते.

संपादकीय भूमिका

असे कितीही आतंकवादी ठार मारले, तरी त्यांचा निर्माता पाकिस्तान आणि काश्मीरमधील जिहादी वृत्ती यांना जोपर्यंत ठेचून काढले जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !