मुख्य संपादकांवर थेट आरोप असल्याखेरीज त्यांना उत्तरदायी ठरवता येणार नाही ! –  सर्वोच्च न्यायालय

‘इंडिया टुडे’ या नियतकालिकाचे माजी संपादक अरुण पुरी

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकाचे माजी संपादक अरुण पुरी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर निकाल देतांना ‘एखाद्या माध्यम संस्थेच्या मुख्य संपादकांवर थेट आरोप अथवा त्यांचा थेट सहभाग असल्याखेरीज लेखकाच्या अथवा पत्रकाराच्या मजकूरासाठी त्यांना उत्तरदायी ठरवता येणार नाही’, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. वर्ष २००७  मध्ये ‘इंडिया टुडे’मध्ये ‘मिशन मिसकंडक्ट’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ब्रिटन येथे कार्यरत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील ३ उच्चपदस्थ अधिकार्‍यांवर आरोप करण्यात आले होते. त्यांपैकी एकाने तत्कालीन संपादक अरुण पुरी आणि संबंधित पत्रकार यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला प्रविष्ट केला होता.

यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आरोप सबळ आणि थेट असतील, तर मुख्य संपादकांना कोणतीही सूट देता कामा नये. त्याचप्रमाणे, संपादकांवर थेट आरोप नसतील, तर त्यांना उत्तरदायी ठरवता येणार नाही.