राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी त्याग करण्याची सिद्धता असलेले  दैनिक ‘सनातन प्रभात’चे पणजी, गोवा येथील वाचक श्री. प्रमोद फडते (वय ६३ वर्षे)!

‘एक दिवस मला श्री. प्रमोद फडते यांचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला माझ्या कुटुंबियांना घेऊन सनातनच्या आश्रमात येऊन साधकांच्या समवेत भोजन करायचे आहे.’’ सर्वसाधारण व्यक्ती स्वतःचा वाढदिवस कुटुंब आणि नातेवाईक यांच्या समवेत साजरा करते. त्यांचा आश्रमात येण्यामागे अजून एक उद्देश होता, ‘त्यांच्या कुटुंबाने आश्रम पहावा. साधना करावी. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य कसे चालते ? हे त्यांना समजावे’, असे त्यांनी माझ्याजवळ मत व्यक्त केले. श्री. प्रमोद फडते हे गेली २० वर्षे पणजी येथे लादी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. ते व्यवसाय तत्त्वनिष्ठतेने आणि प्रामाणिकपणे करतात.

श्री. प्रमोद फडते

श्री. प्रमोद फडते यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. आनंदी आणि हसतमुख

ते नेहमी आनंदी आणि हसतमुख असतात. त्यांच्या तोंडवळ्यावर नेहमीच हास्य असते.

२. शिकण्याची वृत्ती

ते नेहमी ‘राष्ट्र आणि धर्म कार्य यांविषयी नवीन काय चालू आहे ?’, हे जाणून घेतात. तेव्हा त्यांची शिकण्याची वृत्ती लक्षात येते.

३. ते नम्र असून सर्वांशी मिळून-मिसळून वागतात. 

४. त्याग

ते नेहमी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये विज्ञापन देतात. आश्रमासाठी धान्य अर्पण करतात. आता ते म्हणतात, ‘‘मी आता प्रत्येक मासाला अर्पण देणार आहे. मला सनातन संस्थेसाठी १०० पटींनी कार्य करायचे आहे.’’

५. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांची आस्थेने विचारपूस करणे

मी त्यांना गेली १२ वर्षे ओळखतो. त्यांचा आणि माझा साधारण १५ दिवसांनी संपर्क होतो. त्या संपर्कात ते प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांची विचारपूस करतात.

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून एखाद्या विज्ञापनदात्यामध्ये देव कसे पालट करत आहे आणि ते साधनेत कसे पुढे जात आहेत’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रमोद फडते ! देवा, हे तू मला सर्व जवळून अनुभवण्यास दिलेस; म्हणून तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२२)