१. ‘ज्यांना जाणिवेच्या पलीकडील (सूक्ष्मातील) जग पहाता येते, ते धन्य आहेत. हा प्रयोग सर्वांनी अनुभवण्यासारखा आहे.’ – श्री. सतीश व्यंकटराय भट, काणकोण, गोवा.
२. ‘प्रदर्शन पाहून सूक्ष्म जगताचा अनुभव प्राप्त करण्याविषयी माझ्या मनात एक प्रकारची आस्था निर्माण झाली.’ – श्री. धनाजी रामचंद्र मोहिते (अध्यक्ष, कॉन्टॅ्रक्टर असोसिएशन), तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
३. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन’, ही सर्व गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या पुराव्यासहित सिद्ध करण्याची फार चांगली योजना आहे.’ – श्री. प्रवीण क. डोंगरे, जायंटस ग्रुप, कर्ला, रत्नागिरी.
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.६.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात. |