धाराशिव येथील आंदोलकांनी एस्.टी. बस फोडल्या !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

धाराशिव – येथे शेतकरी पीक विम्यासाठी ठाकरे गटाकडून ‘धाराशिव बंद’ची हाक देण्यात आली होती. या वेळी अज्ञातांनी एस्.टी. बसगाड्या फोडल्या. याचा परिणाम ‘धाराशिव बस डेपो’च्या वाहतुकीवर झाला होता. अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांना तातडीने साहाय्य मिळावे, यासाठी ठाकरे गटाचे कैलास पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.