धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. मोहन गौडा

केवळ कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशभरात धर्मांतरबंदी कायदा आणायला हवा, यासाठी हिंदु जनजागृती समिती विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह कार्य करत आहे. धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जाईल, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मांतराचा प्रयत्न केला जाणार्‍या ठिकाणी वैध मार्गाने विरोध करण्यासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे. हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.