रशियाने केला अणूयुद्धाचा सराव !

मॉस्को (रशिया) – रशियाने २६ ऑक्टोबर या दिवशी अणूयुद्धाचा सराव केला आहे. यासाठीच्या दलाने हा सराव केला. स्वतः राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन नियंत्रण कक्षातून या सरावावर लक्ष ठेवून होते. हा सराव अणूयुद्धाच्या संकटाला प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.