लातूर एस्.टी. विभागात २१ नवीन बसगाड्यांचे उद्घाटन !

प्रतीकात्मक छायाचित्र

लातूर – येथील एस्.टी. विभागात २१ नवीन बसगाड्यांचे उद्घाटन उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते करण्यात आले. अंबाजोगाई रस्त्यावरील बसस्थानक क्रमांक २ वर या नवीन बसगाड्यांचे स्वागत करण्यात आले. आयशर आस्थापनाच्या या बसगाड्या असून त्या लवकरच टप्प्याटप्प्याने विभागातील विविध मार्गांवर धावणार आहेत. या बसगाड्यांमध्ये सर्व सवलतीधारकांना प्रवास करता येणार आहे. आरामदायक, सुरक्षित बसगाड्या साध्या दरात धावणार असून या बसगाड्यांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन चन्ने यांनी केले. लवकरच या बसगाड्या परभणी, धाराशिव, उद्गीर, सोलापूर आणि अंबाजोगाई आदी मार्गांवर प्रवाशांच्या सेवेसाठी सोडणार असल्याचे विभाग नियंत्रक अश्वजीत होनराव यांनी सांगितले.