नागपूर येथे अनेकांची फसवणूक करणार्‍यावर गुन्हा नोंद !

सौजन्य- Nagpur Today

नागपूर – वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्याच्या बहाण्याने होमिओपॅथी आधुनिक वैद्याला ४ कोटी ५० लाख रुपयांचा गंडा घालणारा आणि मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून अनेकांची अनुमाने २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक करणारा कथित सामाजिक माध्यमाचा (सोशल मिडियाचा) विश्लेषक अजित पारसे याच्याविरुद्ध गुन्हे शाखेने १८ ऑक्टोबर या दिवशी गुन्हा नोंद केला आहे. पारसे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तूर्तास त्याला अटक केलेली नाही. महिलांना आपल्या जाळ्यात ओढून पारसे याने त्यांच्याशी अश्लील संवाद चालू केला होता. त्याचा भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक पोलिसांनी जप्त केला आहे. यात महिलांचे संभाषण आणि भ्रमणभाष क्रमांक आहेत.

संपादकीय भूमिका

अशांकडून फसवणूक केलेली रक्कम वसूल केल्यासच त्यांना धडा मिळेल !