गायीच्या शेणामध्ये श्री लक्ष्मीदेवीचा वास असतो ! – उत्तरप्रदेशचे मंत्री धर्मपाल सिंह

धर्मपाल सिंह

हरदोई (उत्तरप्रदेश) – देशी गायीचे दूध अमृत आहे. गायीच्या शेणामध्ये श्री लक्ष्मीदेवीचा वास असतो. गोमूत्रामध्ये गंगामाता रहाते. गोमूत्र घरामध्ये शिंपडल्यास वास्तूदोष आणि ग्रहदोष दूर होतात. गायीच्या शेणापासून बनलेले ९ दिवे लावल्याने घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे पशूधन आणि दुग्ध विकासमंत्री धर्मपाल सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. या वेळी त्यांनी ‘मुसलमानांनी गायीच्या शेणापासून बनवलेले दिवे लावून घर प्रकाशित करावे’, असे आवाहन केले. ‘आम्ही मुख्यमंत्र्यांना अयोध्येत लावण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेल्या सव्वा लाख पणत्या दिल्या आहेत’, अशी माहितीही सिंह यांनी या वेळी दिली.