उपळवे (सातारा) येथे ५ लाख २५ सहस्र रुपयांची गांजाची झाडे पोलिसांच्या कह्यात !

सातारा, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – फलटण तालुक्यातील उपळवे येथील माळ नावाच्या शिवारात ५ लाख २५ सहस्र रुपयांची १३ किलो गांजाची झाडे पोलिसांनी कह्यात घेतली. या प्रकरणी हिंदुराव दादू लंबाते आणि सागर हिंदुराव लंबाते या दोन्ही पिता-पुत्रांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजून कुठे गांजाची शेती चालू आहे का ? याविषयी फलटण पोलीस अन्वेषण करत आहेत. लंबाते यांच्या शेतात आढळून आलेली गांजाची झाडे ही ३ ते ८ फूट उंच वाढलेली होती. उसाच्या मध्ये ही शेती होत असल्यामुळे याचा कुणालाही संशय आला नाही.

संपादकीय भूमिका 

छुप्या पद्धतीने गांजाची शेती करणार्‍या पिता-पुत्राला कठोर शिक्षा करावी !