१५ दिवसांतून एकदा जीवामृताची फवारणी करण्याचे लाभ

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘१५ दिवसांतून एकदा १ लिटर पाण्यामध्ये १०० मि.लि. गाळलेले जीवामृत मिसळून किंवा २५ मि.लि. गाळलेले आंबट ताक आणि ७५ मि.लि. गाळलेले जीवामृत असे मिश्रण मिसळून त्याची झाडांवर फवारणी करावी. या फवारणीमुळे झाडाच्या पानांमधून होणारी बाष्प उत्सर्जनाची क्रिया नियंत्रित होते. झाडाची प्रतिकारशक्ती वाढते. झाडाला होणारे विविध विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग आटोक्यात येतात.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.

(६.१०.२०२२)