मुंबई – निवडणूक आयोगाने चिन्ह ठरवण्यासाठी पुरेसा वेळ न देता शिवसेनेवर अन्याय केला आहे. निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी याचिका प्रविष्ट केली. याविषयी ११ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, त्यांनी जेवढा वेळ मागितला होता, तेवढा निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यांनी आधी २ आठवडे मागितले, मग ४ आठवडे मागितले; पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर आरोप करून त्यांना कमकुवत करण्याचे काम चालू आहे.