जत (जिल्हा सांगली) – पाण्यापासून वंचित असलेल्या जत तालुक्यातील भागांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करू. जत तालुक्यातील नागरिकांच्या मागण्या पूर्ण करू, आवश्यक विकासकामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देऊन पूर्ण करू, अशी ग्वाही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. ‘जलजीवन मिशन योजने’च्या अंतर्गत जाडरबोबलाद येथे २ कोटी ४० लाख ३१ सहस्र रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी ही ग्वाही दिली.