हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात देवीची ओटी भरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना !

श्री महालक्ष्मी मंदिरात हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.

या प्रसंगी ‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेचे संस्थापक श्री. रणजित घरपणकर, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, शरद माळी, कैलास (आबा) जाधव, ‘ऋणमातृभूमी’ संघटनेचे श्री. राहुल कदम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, सौ. राजश्री तिवारी यांसह अन्य उपस्थित होते.

विशेष

श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आलेले काही भाविक प्रार्थनेत सहभागी झाले होते. २ तरुणांनी समितीच्या कार्याची माहिती घेऊन समितीचे कार्य चालू करण्याविषयी उत्सुकता दाखवली.