जनहितकारी निर्णय घेणार्या गोवा शासनाचे अभिनंदन !
पणजी, २९ सप्टेंबर (वार्ता.) – सरकारी कामासंबंधी प्रविष्ट करण्यात आलेल्या धारिका किंवा प्रस्ताव ३ दिवसांत हातावेगळ्या कराव्यात, असा आदेश गोवा शासनाने सर्व सरकारी खात्यांना दिला आहे. या आदेशात म्हटले आहे, ‘‘सर्व खात्यांनी प्रशासकीय कामात गती आणावी. सरकारी कामासंबंधी प्रविष्ट केलेल्या धारिका किंवा प्रस्ताव यांवर त्वरित निर्णय घेऊन त्या ३ दिवसांत हातावेगळ्या कराव्यात. धारिकांसंबंधी खात्यांर्तगत सल्ला घेणे किंवा पडताळणी करायची असल्यास ती धारिका स्वीकारल्यानंतर ७ दिवसांत करावी. सर्व उच्चस्तरीय बैठकांचे इतिवृत्त संबंधित अधिकार्याकडे ३ दिवसांत सादर करावे. या इतिवृत्तामध्ये खात्यातील संबंधित अधिकार्यांना सोपवलेल्या उत्तरदायित्वाविषयी उल्लेख असावा. हे इतिवृत्त लिहितांना किंवा सरकारी पत्रव्यवहार करतांना कागदाच्या दोन्ही बाजूंचा उपयोग करावा.’’