२३ सप्टेंबरला केरळमध्ये बंद पाळून हिंसाचार केल्याचे प्रकरण
थिरूवनंतपूरम् (केरळ) – अन्वेषण यंत्रणांकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ठिकाणांवर २२ सप्टेंबरला धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्याविरोधात २३ सप्टेंबरला या संघटनेकडून ‘बंद’चे आवाहन करण्यात आले होते. या बंदच्या काळात हिंसाचारही करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने या घटनेची स्वतः नोंद घेत त्यावर सुनावणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या नेत्यांना येत्या २ आठवड्यांमध्ये हानीभरपाई म्हणून ५ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, हिंसाचार करून लोकांचे जीवन धोक्यात घालता येणार नाही. या कारवाईमुळे यापुढे अशा प्रकारचा हिंसाचार करण्याचे धाडस कुणीही करणार नाही. जर कुणी केले, तर त्याला त्याची किंमत चुकवावी लागेल. राज्यघटना लोकांना निदर्शने करण्याची अनुमती देते; मात्र बंद पाळता येणार नाही.
#Keralahighcourt orders #PFI to pay Rs 5.2 crore for damages caused during hartalhttps://t.co/fLSl45liHh
— DNA (@dna) September 29, 2022
संपादकीय भूमिका
|