कर्नाटकातील शाळेत महंमद पैगंबर यांच्याविषयीच्या पुस्तकाचे विनामूल्य वाटप : पैगंबरांविषयीच्या निबंध स्पर्धेचे आयोजन

गदग (कर्नाटक) – येथील नागवी गावातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक अब्दुल हनिफ बिजापुरा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयीच्या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले. शाळेत पैगंबर यांच्याविषयी निबंध स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्या स्पर्धकाला ५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित केले. याविषयीची माहिती मिळताच श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांची भेट घेऊन त्यांना खडसावले.  या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशीचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी चौकशी करून आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकार्‍यांनी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना दिले. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

हिजाबनंतर आता महंमद पैगंबर यांच्याविषयी शिकण्याचा आग्रह धरला जात आहे ! कर्नाटकचे किती मोठ्या प्रमाणात इस्लामीकरण झाले आहे, हेच यातून दिसून येते !