‘पी.एफ्.आय.’ वरील बंदीचे सुफी आणि बरेलवी मौलवींकडून स्वागत

राष्ट्रापेक्षा संस्था आणि विचार मोठे नाहीत !

(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)

नवी देहली – ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातल्यानंतर विरोधी पक्षांकडून रा.स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी केली जात असतांना दुसरीकडे मुसलमानांच्या काही संघटनांनी बंदीचे स्वागत केले आहे. सुफी आणि बरेलवी मौलवींनी बंदीचे स्वागत केले आहे.

१. ‘अखिल भारतीय सुफी सज्जादानशीन परिषदे’च्या अध्यक्षांनी म्हटले की, जर आतंकवादावर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असेल, तर सर्वांनी धीर राखला पाहिजे आणि सरकारच्या या पावलाचे स्वागत केले पाहिजे. कोणतीही संस्था किंवा विचार यांपेक्षा राष्ट्र मोठे आहे. जर कुणी देशाचे तुकडे करण्याची गोष्ट करत असेल, तर त्याला येथे रहाण्याचा अधिकार नाही. अखिल भारतीय सुफी सज्जादानशीन परिषद नेहमीच देशाची एकता, सार्वभौमत्व आणि शांतता यांसाठी कटीबद्ध आहे. आमची परिषद पुढेही देशविरोधी शक्तींच्या विरोधात आवाज उठवत राहील.

२. ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’कडूनही पी.एफ्.आय.वरील बंदीचे स्वागत करण्यात आले आहे. यापूर्वीच या संघटनेने ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी केली होती.