भाग्यनगर (हैदराबाद) येथे मंडपात घुसून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड : २ मुसलमान महिलांना अटक

भाग्यनगर – तेलंगाणा राज्यातील भाग्यनगर शहरात दुर्गापूजा मंडपात घुसून दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याच्या प्रकरणी २ मुसलमान महिलांना अटक करण्यात आली आहे. भाग्यनगरच्या मध्य विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबर २०२२ या दिवशी सकाळी दोन मुसलमान महिलांनी खैरताबादमधील एका दुर्गापूजा मंडपामध्ये घुसून दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. एका स्थानिक व्यक्तीने त्या महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्या व्यक्तीवर आक्रमण केले. त्यानंतर स्थानिक लोकांनी दोघींना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी पोलीस अन्वेषण चालू आहे. दुर्गापूजा मंडपात झालेल्या तोडफोडीनंतर हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा घटना घडायला भाग्यनगर भारतात आहे कि पाकिस्तानात ?
  • हिंदूंच्या प्रत्येक सण-उत्सवाच्या वेळी देशात अशांतता पसरवणार्‍या धर्मांधांच्या उद्दामतेला आळा घालण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापणे अपरिहार्य !
  • हिंदुद्वेष व्यक्त करण्यात मुसलमान महिला मुसलमान पुरुषांपेक्षा जराही मागे नाहीत, हेच यावरून दिसून येते ! अशांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी तरी हिंदू करणार का ?