(म्हणे) ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणे हा उपरोधिक विरोध !

राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांचा जावईशोध !

शिवानंद तिवारी

पाटलीपुत्र (बिहार) – पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेच्या ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्याच्या प्रकरणी निदर्शने करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यावर राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले, ‘हा त्यांचा विरोध करण्याचा एक प्रकार आहे. हे त्यांचे प्रकरण असल्याने यावर कोणतेही मत व्यक्त करणे अयोग्य आहे. ते उपरोधिक टीका करत आहेत. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हटल्याने ते पाकिस्तानी ठरत नाहीत. आता तुम्ही प्रत्युत्तर म्हणून त्यांना मारण्याची भाषा करत आहात. यामुळे अन्य देशांतील भारतियांना त्रास सहन करावा लागतो. ज्या देशात भारतीय आहेत, तेथे त्यांच्याविषयी द्वेष निर्माण होत आहे.’

संपादकीय भूमिका

उद्या पी.एफ्.आय.वाल्यांनी भारतात दुसर्‍या पाकिस्तानची मागणी केली, तर शिवानंद तिवारी असेच म्हणणार आहेत का ? देशद्रोह्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्‍यांवरही गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !