स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी त्यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने  साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याविषयी स्फुरलेले काव्य, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. प्रीती

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांशी त्यांच्या (साधकांच्या) वयाला आणि स्थितीला अनुसरून बोलतात.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ स्वतः अध्यात्म जगतात आणि इतरांना अध्यात्म जगायला शिकवतात.

३. कपडे ठेवलेल्या खणातून चांगली स्पंदने येणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कपडे आणि साड्या अतिशय व्यवस्थित ठेवलेल्या असतात. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कपडे ठेवलेल्या खणातून जशी स्पंदने येतात, तशी स्पंदने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कपडे ठेवलेल्या खणातून येतात’, असे मला जाणवते.

४. अहंशून्यता

कु. अमृता मुद्गल

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून कधी साधकांना निरोप द्यायचा राहिल्यास त्या क्षमा मागतात. त्या संबंधितांना सांगतात, ‘‘मी चुकले. माझ्याकडून राहिले.’’

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना अनेक यज्ञांना उपस्थित रहायला महर्षि सांगतात. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वेळोवेळी महर्षींचे आज्ञापालन करून त्यांची कृपा संपादन केली आहे.

६. गुरु-शिष्याचे आदर्श नाते !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनात २४ घंटे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्च कोटीचा भाव असतो. एकदा एका ताईने मला सांगितले, ‘‘गुरूंच्या कृतीतून शिष्याने शिकायचे असते.’’ ‘याचे आदर्श उदाहरण, म्हणजे ‘परात्पर गुरु डॉक्टर’ आणि ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आहेत’, असे मला वाटते. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना घडवले आहे, तर परात्पर गुरु डॉक्टर म्हणतात, ‘‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ स्वतः छान घडल्या.’’

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्या चुका सांगतांना मला आनंद होऊन कृतज्ञता वाटते.’

– कु. अमृता मुद्गल (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२१)


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

१. साधिकेची सेवा नाही, तर साधना चांगली व्हावी यासाठी मार्गदर्शक तिला तिची चूक सांगतात !

‘एकदा माझ्याकडच्या काही सेवा प्रलंबित होत्या. मी त्याचा आढावाही उत्तरदायी साधकाला दिला नाही. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला म्हणाल्या, ‘‘तू सेवा प्रलंबित ठेवल्यास; म्हणून उत्तरदायी साधकाने चूक सांगितली नाही. तुझी सेवा प्रलंबित आहे; म्हणून तू सेवा आढावा दिला नाहीस, यात तुझी साधना झाली का ? ईश्वर त्याचे कार्य करील; पण तुझी साधना तुला करायची आहे.’’

२. साधिकेची सेवा नाही, तर प्रगती व्हावी यासाठी मार्गदर्शक तिला तिची चूक सांगतात !

एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चुका सांगितल्यावर मला थोडा ताण आला. त्यांनी दुसर्‍या दिवशी मला बोलावले आणि त्या म्हणाल्या, ‘‘तू साधनेत लवकर पुढे जावेस, तुझी प्रगती व्हावी; म्हणून चुका सांगितल्या. सेवेपेक्षा तू आणि तुझी साधना महत्त्वाची आहे. गुरुमाऊलीला तुझी प्रगती होणे अपेक्षित आहे. ते तुला घडवत आहेत.’’

– कु. अमृता मुद्गल (३०.१.२०२१)


आई, तुझ्या रूपे साक्षात् जगदंबा अवनीवरी अवतरली ।

श्री. संजय घाटगे

भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखातून आई जगदंबेची मधुर वाणी अनुभवायला आली. त्या वेळी मला पुढील ओळी सुचल्या.

तुझ्या (टीप १) कृपेचा ओघ झेलण्या ।
असे झोळी आमची फाटकी ।
तुझ्या रूपे साक्षात् जगदंबा अवनीवरी अवतरली ।। १ ।।

भाववृद्धी सत्संगात ऐकता तुझी मधुर वाणी ।
वाटे मला नसे हा स्वर भूलोकीचा ।
तर असे साक्षात् देवलोकीचा ।। २ ।।

या स्वराच्या आराधनेत साधक विसरून जाती देहभान ।
क्षणार्धात लागते साधकांचे ध्यान ।
यास्तव मज वाटे, जगदंबा अवनीवरी अवतरली ।। ३ ।।

देवीच्या अनेक कथा वाचल्या अन् ऐकल्या ।
परि देवी कधी न पाहिली ।
तुझ्या रूपे आई, गुरुमाऊलीने (टीप २) तीही इच्छा पूर्ण केली ।। ४ ।।

भाववृद्धी सत्संगात वहाते, तुझ्या मुखातून ज्ञानगंगा ।
आम्ही अज्ञानी साधक त्या चैतन्याच्या स्रोतात न्हातो ।
नकळत नेत्रांतून गालांवरी ओघळतात गंगा-यमुना ।। ५ ।।

वहातो ही शब्दसुमनांजली, तव मंगल चरणांवरी आई ।
तू न केवळ सद्गुरु, माऊली आहेस आई ।
तुझ्या रूपे साक्षात् जगदंबा अवनीवरी अवतरली ।। ६ ।।

टीप १ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या

टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (२०.१०.२०२०)


गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘मागील वर्षी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) पाठवलेली भेटवस्तू आणि प्रसाद देण्यात आला. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांनी दिलेले अनमोल आहे.’’ त्या वेळी त्यांची भावावस्था पाहून ‘त्यांचा गुरूंप्रती कृतज्ञताभाव किती आहे !’, हे मला अनुभवता आले.’

– कु. मृण्मयी गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात साधकाला जाणवलेली सूत्रे

१. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्यावर मला एक वेगळाच आनंद होतो. त्यांचे स्मरण केले, तरी मला उत्साह जाणवतो.

२. त्यांच्याकडे बघितल्यावर मला माझ्या आईच्या प्रेमाची आठवण येते. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ माझ्या आईच आहेत’, असे मला वाटते.

३. त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर मला तेज जाणवते आणि त्या तेजामुळे मला चैतन्य मिळाल्यासारखे जाणवते.

४. त्यांच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ‘त्या साक्षात् दुर्गादेवीचा अवतार आहेत’, असे मला वाटते.

त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– कु. दयानंद पाटील (वय २० वर्षे), खानापूर, बेळगाव. (३.८.२०२०)


श्री. शंकर नरुटे यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना केलेली काव्यमय प्रार्थना !

‘सद्गुरु ताई (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ), माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होत नाहीत. त्याबद्दल मला क्षमा करा. ‘मला या मायाजाळातून मुक्त करा. ‘मला पूर्वीसारखा आनंदी राहून सेवा करणारा तुमचा ‘शंकर’ बनवा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

मला सर्वत्र नारायण दिसो ।
नेहमी माझ्या मुखावर हसू राहू दे ।
स्वभावदोष आणि अहं यांमध्ये मी कधी न फसू दे ।
गुरुचरणी सदैव मला स्थान मिळू दे ।।
सद्गुरुताई, मला तुम्हाला अपेक्षित असे बनवा !’

– आपला चरणसेवक,

श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.१२.२०२१)

या लेखात आणि कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक