लिसेस्टर (ब्रिटन) येथील हिंसाचाराच्या प्रकरणी ऐमॉस नोरोन्हा नावाच्या तरुणाला १० मासांच्या कारावासाची शिक्षा

लिसेस्टर (ब्रिटन) – येथे पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ४७ जणांना अटक केली आहे. तसेच या हिंसाचारात ऐमॉस नोरोन्हा या २० वर्षांच्या तरुणाला बंदी असलेले शस्त्र बागळल्याच्या प्रकरणी १० मासांची शिक्षाही सुनावली आहे. ‘या हिंसाचाराच्या संदर्भात कुणाकडे अधिक माहिती असेल, तर आम्हाला कळवा’, असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. या हिंसाचारात १६ पोलीस घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

ब्रिटनप्रमाणे भारतात असा जलद गती न्याय कधी मिळणार ?

प्रमारमाध्यमांकडून हिंदुविरोधी वार्तांकन ! – प्रत्यक्षदर्शी

हिंसाचारातील एक प्रत्यक्षदर्शी दीशिता सोलंकी यांनी सांगितले की, येथील प्रसारमाध्यमांनी या हिंसाराचे वार्तांकन हिंदुविरोधी केले आहे. ‘हिंदूंनी आक्रमण केले’, अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. मला वाटते प्रामाणिकपणे वार्तांकन केले पाहिजे; मात्र ते दिसून आलेले नाही. मी जे पाहिले त्याच्या विरुद्ध प्रकाशित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

ब्रिटनमधील प्रसारमाध्यमेही भारतातील प्रसारमाध्यमांप्रमाणे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी आहेत, हे लक्षात येते !