नाशिक – येथे वर्ष २०२७-२८ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी साधूग्रामसह सिंहस्थासाठीचे भूसंपादन करण्यासमवेत ६० किलोमीटरच्या बाह्य रिंगरोडच्या प्राथमिक प्रस्तावाचे आदेश दिले आहेत. सिंहस्थाच्या १४ अधिकार्यांच्या समन्वय समिती बैठकीत सिंहस्थापूर्वी पायाभूत सुविधांसाठी बांधकाम विभागाने आराखडा सिद्ध करावा, नगररचना आणि मिळकत विभागाने आवश्यक असलेले भूसंपादन, तसेच आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने सेवेच्या संदर्भात प्राथमिक आराखडा सिद्ध करावा, अशा सूचना या वेळी आयुक्तांनी दिल्या.
सिंहस्थात गर्दीचे नियोजन करण्यासाठी बाह्य रिंगरोड सिद्ध केला जाणार आहे.सध्या ६० किलोमीटर लांबी आणि ३० मीटर रूंदी असा बाह्य रिंगरोड आहे; मात्र हा रस्ता अपूर्ण अवस्थेत असून तो ६० मीटर रूंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यशासनाकडून निधी मिळवला जाणार आहे.