महाराष्ट्रात साधू-संतांच्या संरक्षणासाठी नवीन कडक कायदा बनवा ! – श्री श्री श्री १००८ महंत योगी भाईनाथ महाराज, मठाधीश, श्री कालभैरव मठ, मुंबई

लवंगा (जिल्हा सांगली) गावात साधू-संतांना मारहाण झाल्याच्या प्रकरणी प्रतिक्रिया

मुंबई – पालघरप्रमाणेच सांगलीतील जुन्या आखाड्याच्या साधूंना पंढरपूरकडे जातांना गाडी अडवून बेदम मारहाण करणे निषेधार्ह आहे. आज हिंदुत्वनिष्ठ सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे साधूंना मारहाण झाल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी. साधू-संतांचा उद्देश समाजसेवा आणि धर्मप्रसार आहे; मात्र आमच्यावर जर असे भ्याड आक्रमण करणार असतील, तर आम्हाला शास्त्रासोबत शस्त्राची अनुमती द्या आणि साधू-संतांच्या महाराष्ट्रात आमच्या संरक्षणासाठी नवीन कडक कायदा बनवा !

आमच्या सनातन परंपरेला हात लावाल, तर नष्ट व्हाल ! – आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीप्रमुख, मुंबई

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात साधू-संतांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. समाजकंटकांना ठणकावून सांगतोय, ‘महाराष्ट्रात आता ‘अस्सल हिंदुत्वनिष्ठांचे सरकार आहे; आमच्या सनातन परंपरेला हात लावाल, तर नष्ट व्हाल. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होईल.’

या घटनेत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ! – राम कदम, आमदार, भाजप

महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत होत असलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. असे प्रकार आम्ही सहन करणार नाही, तसेच या घटनेत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी !