पोलिसांनी अचलपूर (अमरावती) येथील श्री गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक मुसलमानाच्या अंत्ययात्रेसाठी थांबवली !

हिंदूंनी अंत्ययात्रेस वाट करून दिली !

अचलपूर (अमरावती) – येथे अनंतचतुर्दशीच्या दिवशी शहरातून जवळपास २ सहस्र लोक सहभागी असलेली श्री गणेशमूर्तींची मोठी मिरवणूक जात असतांना मध्येच एका मुसलमानाची अंत्ययात्रा आल्यामुळे मिरवणूक थांबवण्यात आली, तसेच या वेळी मिरवणुकीतील वाद्ये, लेझिम आदी बंद ठेवण्यात आले.

शहरातील एका प्रसिद्ध मुसलमान व्यक्तीची अंत्ययात्रा बिलनपुरा येथे सायंकाळी आली असतांना भर रंगात आलेली मिरवणूक थांबवण्यात आली आणि या अंत्ययात्रेला वाट करून देण्यात आली. पोलिसांकडून पुढाकार घेऊन हिंदूंना मिरवणूक आणि वाद्ये वाजवणे थांबवायला सांगण्यात आले होते. या घटनेवरून तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मी यांच्याकडून गणेशभक्तांचे कौतुक होत आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु सहिष्णू आणि जुळवून घेणारे आहेतच; पण सर्वधर्मसमभाव पाळायची वेळ येते, तेव्हा किती मुसलमान याप्रमाणे वागतात ?
  • मोहर्रमच्या मिरवणुकीच्या वेळी असा सामोपचार दाखवण्यात आला असता का ? पोलिसांनी अशी मिरवणूक हिंदूच्या अंत्ययात्रेसाठी थांबवण्याचे धाडस केले असते का ?