वाहनामध्ये अवैध साहित्य नसतांना पोलिसांनी दंड भरण्याचे कारण सांगत चहा-पाण्यासाठी पैसे मागणे

लाच मागणारे भ्रष्टाचारी पोलीस !

‘काही दिवसांपूर्वी मी माझ्या स्वतःच्या गाडीने बाहेरगावी जात होतो. माझ्या समवेत गाडीमध्ये माझे मित्र आणि काही साधक यांसह काही साहित्य होते. आम्ही जातांना महामार्गावर एके ठिकाणी एका पथकर (टोल) नाक्यावर पोलिसांनी आम्हाला अडवले. पोलिसांनी मला गाडीचे अनुज्ञप्तीपत्र (लायसेंस) मागितल्यावर मी ते दाखवले. ते बघून ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या गाडीत पुष्कळ मोठे साहित्य आहे. ही मालवाहतूक गाडी आहे का ?’’ खरेतर माझ्या गाडीत ‘मला दंड भरावा लागेल’, असे साहित्य काहीच नव्हते. त्यामुळे त्यांनी आम्हाला सोडायला हवे होते. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, ‘‘हे आमच्या घरचे साहित्य आहे’’; पण त्यांनी माझे ऐकले नाही. उलट त्यांनी ‘आम्हाला काहीतरी द्या, चहा-पाण्याचा खर्च द्या’, असे म्हणत माझ्याकडून पैसे घेतले.’ – एक साधक

(पोलिसांविषयी अशा प्रकारचे चांगले-वाईट अनुभव आले असल्यास नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवा ! – संपादक)