जहांगीरपुरी हिंसाचारात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांचा सहभाग ?

आज देशातील धर्मांध मुसलमानांकडून येनकेन प्रकारेण हिंदूंना लक्ष्य करण्याचे धाडस वाढतच चालले आहे. ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) ही हिंदुविघातक मोहीम हा त्यातीलच अधिक भयावह प्रकार ! अशातच हिंदूंचे सण म्हटले की, ते शांततापूर्ण रूपाने होणे सध्या अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. आता गणेशोत्सव चालू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असे प्रत्येक हिंदूला वाटते; परंतु देशात हैदोस निर्माण करणार्‍या शांतीदूतांविषयी काहीही सांगता येत नाही, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. एप्रिल २०२२ मध्ये श्रीरामनवमी आणि त्यानंतर हनुमान जयंती या दिवशी देशातील अनेक राज्यांत हिंदूंच्या विरोधात दंगली घडवण्यात आल्या. देवतांच्या मूर्तींचा अनादरही करण्यात आला. १६ एप्रिल २०२२ म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी देहलीतील जहांगीरपुरी या मुसलमानबहुल भागातही अशाच प्रकारे दंगल घडवण्यात आली होती. त्याचाच वेध घेणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

देहलीतील जहांगीरपुरीतील दंगलीचे छायाचित्र

१. देशात हिंसाचार माजवण्यासाठी समाजकंटकांना बांगलादेशी आणि रोहिंग्या यांचे साहाय्य !

देशातील सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न देशातील समाजकंटक करत आहेतच; पण त्यांना भारतात अवैधपणे रहाणारे रोहिंग्या आणि बांगलादेशी हेही साहाय्य करत आहेत, हे देहलीच्या जहांगीरपुरीमधील घटनेवरून दिसून आले आहे. दंगली घडवणार्‍या या समाजकंटकांचा बंदोबस्त तर झालाच पाहिजे; पण देशातील वातावरण बिघडवणारे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांचीही त्वरित हकालपट्टी केली पाहिजे.

देशात ‘हिजाब’, ‘हलाल’ आणि ‘अजान’ यावरून काही भागात संघर्ष अन् तणाव यांचे वातावरण आहे. त्यातच समाजकंटकांनी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे करून या तणावात अधिकच भर टाकण्याचे काम केले. देहलीमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीवर जहांगीरपुरी भागात आक्रमण करण्यात आले. ‘हे आक्रमण एक पूर्वनियोजित कट होता’, असा आरोप देहली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता आणि खासदार मनोज तिवारी यांनी केला आहे. ‘देहलीत अवैधपणे रहात असणारे विदेशी नागरिक या हिंसाचाराला उत्तरदायी होते. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी भाजपने केली आहे.

२. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना संरक्षण देणारे अन् त्यांना स्थिरस्थावर होण्यास साहाय्य  करणारे देशासाठी अधिक धोकादायक !

देहलीत अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या रोहिंग्यांची संख्या बरीच मोठी आहे. या रोहिंग्यांना आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल सरकारने मोफत वीज आणि पाणी उपलब्ध करून दिले आहे. जहांगीरपुरीमधील ज्या ‘सी ब्लॉक’मध्ये हिंसाचार झाला, त्या भागात आणि ‘एच-२’ झोपडपट्टीमध्ये बांगलादेशी मोठ्या संख्येने रहातात, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या लोकांना संरक्षण देणार्‍या आणि त्यांना तेथे स्थिरस्थावर होण्यास साहाय्य करणार्‍यांपासूनही अधिक धोका आहे. ‘हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर झालेल्या आक्रमणाला आतंकवादी आक्रमण समजण्यात यावे, तसेच अवैधपणे रहात असलेल्या नागरिकांची भारतातून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी’, अशी मागणी भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी केली आहे.

३. ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांच्याकडून हिंसाचार करणार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न !

जहांगीरपुरी भागात हिंसाचार उसळल्यानंतर २४ घंट्यांच्या आत पोलिसांनी २३ जणांना अटक केली. या हिंसाचारात रोहिंग्या आणि बांगलादेशी यांचा कितपत सहभाग आहे, त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. या मिरवणुकीवर आक्रमण करण्याची सिद्धता २ दिवसांपूर्वीपासून चालू होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्या भागात हिंसाचार उसळला, तेथील अनेक लोक नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया यांच्या विरोधातील आंदोलनांमध्येही सहभागी झाले होते. त्या दिशेनेही पोलीस अन्वेषण करत आहेत. या प्रकरणात ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांना त्यांच्या समाजबांधवांचा फारच पुळका आल्याचे दिसून येत आहे. ‘एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करणे योग्य नाही. या हिंसाचाराला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे’, असे त्यांनी म्हटले आहे.

४. जहांगीरपुरी भागातील दंगल पूर्वनियोजित कट असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला देणे

या हिंसाचारप्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवालातील माहितीनुसार मिरवणूक शांततापूर्ण वातावरणात निघाली होती. ही मिरवणूक त्या भागातील मशिदीजवळ येताच अंसार आणि त्याचे सहकारी यांनी जाणीवपूर्वक भांडण उकरून काढले. त्यानंतर दगडफेकीला प्रारंभ झाला. पोलिसांनी घटनास्थळाहून ३ तलवारी आणि अन्य शस्त्रे जप्त केली आहेत. हिंसाचार झालेल्या ठिकाणी अचानक पेट्रोल बाँब, शस्त्रे, दगड कसे काय गोळा झाले ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. ‘अंसार आणि अस्लम या दोघांनी २ दिवसांपूर्वीच, म्हणजे १५ एप्रिल या दिवशी हा कट रचला होता’, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.

– दत्ता पंचवाघ, ज्येष्ठ पत्रकार