सोलापूर महापालिकेच्या ४१ शिक्षकांचे स्थानांतर !

पी. शिवशंकर (उजवीकडे )

सोलापूर, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत मराठी, उर्दू, कन्नड, तेलगू माध्यमांच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील ४१ शिक्षकांचे स्थानांतर आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मान्यतेने करण्यात आले. ज्या प्राथमिक शाळेत शिक्षकांनी १० वर्षांहून अधिक सेवा केली आहे, अशा सर्व शिक्षकांचे स्थानांतर शासन निर्णयाच्या ग्रामीण विकास निर्देशाप्रमाणे करण्यात आल्याची माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.

शहरातील मराठी माध्यम विभागातील २२ शिक्षक, उर्दू माध्यमातील १५, कन्नड २ आणि तेलगू २ अशा शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले आहे. दिलेल्या ठिकाणी शिक्षकांनी तात्काळ रुजू होऊन १ सप्टेंबर या दिवशी अहवाल महापालिकेला सादर करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत, असेही उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले.