वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी प्रकरणातील एक याचिकाकर्ते असणारे हरिहर पांडे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून भ्रमणभाषवरून ही धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हरिहर पांडे यांना ज्या क्रमांकावरून धमकी मिळाली होती, त्याच क्रमांकावर त्यांनी पुन्हा संपर्क केला. त्या वेळी समोरून बोलणार्या व्यक्तीने तिचे नाव ‘फहद’ असे सांगून ती मुलगी असल्याचे सांगितले. ‘मी कशाला कुणाला धमकावणार ?’ असे तिने म्हटले
हरिहर पांडे यांचा दावा आहे की, वर्षभरापूर्वीही त्यांना धमकी आली होती. पांडे यांना आधीच पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे. हरिहर पांडे ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर शिवमंदिर उभारण्याच्या मोहीमेत सक्रिय आहेत. ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका त्यांनी स्वत: प्रविष्ट केली होती.