रथयात्रेद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीचा प्रचार करणार !
बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी २३ ऑगस्ट या दिवशी मैैसुरू शहरातील मैसुरू पॅलेस येथील कोटे अंजनेय मंदिरापासून ‘वीर सावरकर रथयात्रे’ला प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘‘अशा रथायात्रेद्वारे वीर सावरकर यांच्यासारख्या लोकांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे योगदान आणि बलीदान यांंविषयी लोकांना जागरूक केले जाईल.’’ ही रथयात्रा ३० ऑगस्ट पर्यंत मैसुरू, मंड्या आणि चामराजनगर जिल्ह्यांमध्ये जाणार आहे.
येडियुरप्पा पुढे म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्रसैनिक नव्हते’, असे दाखवणे अयोग्य आहे, ज्यांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी ठाऊक नाही, ते अशा प्रकारची विधाने करतात. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सावरकर यांच्याविषयी चुकीचे विधान करणे त्यांच्या लौकिकाला साजेसे नाही. जर ते अशी विधाने करतील, तर राज्यातील जनता त्यांना धडा शिकवेल. आम्ही लोकांमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीचा शांततेत प्रसार करणार आहोत.