श्रीनगर – काश्मीरबाहेरील नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला काश्मीरमधील विविध पक्षांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी ‘पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी’च्या प्रमुख महबूबा मुफ्ती, काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर शाखेचे अध्यक्ष विकार रसूल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम्.वाय. तारिगामी यांच्यासह शिवसेना, अवामी नॅशनल कॉन्फरन्स, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त जनता दल आणि अकाली दल (मान) या पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘पीपल्स कॉन्फरन्स’चे सज्जाद लोन आणि ‘अपना पक्षा’चे नेते अल्ताफ बुखारी यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला.
या वेळी फारूख अब्दुल्ला म्हणाले, ‘‘जम्मू-काश्मीरच्या मतदारसूचित काश्मीरबाहेरील नागरिकांचा समावेश करण्याचा निर्णय येथील राजकीय पक्षांना मान्य नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरची वेगळी ओळख नष्ट होईल. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर विधानसभा ‘बाहेरच्या’ लोकांच्या हातात जाईल आणि येथील लोक वंचित रहातील. आम्ही या निर्णयाला कायदेशीर आव्हान तर देऊच; पण विविध मार्गांनी विरोधही करू.’’
संपादकीय भूमिकाऊठसूठ हिंदूंना निधर्मीवादाचे डोस पाजणारे आता काश्मीरमधील पक्षांना निधर्मीवादाचे डोस का पाजत नाहीत ? |