वर्ष १९९९ च्या सामन्यात भारतीय क्रिकेट खेळाडूंना घायाळ करण्याची योजना होती !

  • पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा गौप्यस्फोट

  • आशिया चषक स्पर्धेत २८ ऑगस्टला भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना !

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर

नवी देहली – पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने एक गौप्यस्फोट केला आहे. त्याने म्हटलेे, ‘वर्ष १९९९ मध्ये मोहाली (पंजाब) येथे एका सामन्यात मी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची हाडे तोडू इच्छित होतो.’ येत्या २८ ऑगस्ट या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील सामना होणार आहे. या संदर्भात भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्याशी एका कार्यक्रमात बोलतांना अख्तर याने वरील गौप्यस्फोट केला. यापूर्वीही शोएब अख्तर याने सचिन तेंडुलकर यांच्याविषयी असाच गौप्यस्फोट केला होता.

अख्तर पुढे म्हणाला की, या सामन्यापूर्वी मी भारतीय खेळाडूंना घायाळ करण्याची योजना आखली होती. त्यानुसार मी त्यांचे डोके आणि हाडे यांना लक्ष्य करून गोलंदाजी करत होतो. सौरव गांगुली यांच्यासाठीही योजना आखली होती. आमच्या संघाच्या बैठकीत यावर चर्चाही झाली होती. मला सांगण्यात आले होते की, तुझ्याकडे वेग आहे, तर तू भारताच्या खेळाडूंना घायाळ कर. खेळाडूंना बाद करण्याचे काम दुसरे गोलंदाज करतील. याची माहिती सामना संपल्यानंतर गांगुली यांना मी दिली होती.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानी खेळाडू भारताशी जिहादी मानसिकतेतच क्रिकेट खेळतात हे आता अधिकृतपणे उघड झाले आहे. याविषयी पाकशी क्रिकेट सामने खेळण्याची मागणी करणारे भारतातील पाकप्रेमी तोंड उघडतील का ?
  • भारतातील तथाकथित सर्वधर्म समभाववाले ‘पाकशी क्रिकेट सामने खेळल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारतील’, असे म्हणतात, याउलट पाक भारताविरुद्धच्या सामन्यांकडे सूड उगवण्याची संधी म्हणून पहातो, हेच यावरून सिद्ध होते !
  • अशा पाकशी खेळणे, म्हणजे आपल्याच खेळाडूंच्या जीवाशी खेळणे होय ! त्यामुळे क्रिकेटमध्ये पाकला हरवत बसण्यापेक्षा सरकारने युद्धभूमीवर पाकला कायमचे नामोहरम करावे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !