अमेरिकेकडून ‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

वॉशिंग्टन – अमेरिकेने ‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. ‘या चाचणीच्या माध्यमातून अमेरिकेने तिची संरक्षण क्षमता जगाला दाखवून दिली आहे. ही चाचणी नियमित कार्यक्रमाचा एक भाग असून यापूर्वी ३०० क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे’, असे अमेरिकेने म्हटले आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी ४ ऑगस्टला होणार होती; परंतु त्या कालावधीत अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानचा दौरा करणार होत्या. त्यामुळे ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या चाचणीचा संबंध चीनशी जोडला जात आहे.

या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य काय आहे ?

चाचणीच्या वेळी हे क्षेपणास्त्र ६ सहस्र ७५० किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्यावर मारा करण्यात यशस्वी ठरले. हे जमिनीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा वेग ७.८३ किलोमीटर प्रति सेकंद आहे. त्यामुळे ते काही वेळातच लक्ष्य गाठते. हे ‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्र १० सहस्र किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य गाठू शकते.