जालोर (राजस्थान) येथे भगवा ध्वज फाडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

जालोर (राजस्थान) – येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धर्मांधांनी भगवा ध्वज फाडून टाकला, तसेच ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अरमान खान, अस्लम आणि मंसूर यांना अटक केली. काही वेळ येथे तणावाची स्थिती होती. हिंदु संघटनांनी नंतर पुन्हा येथे भगवा ध्वज लावला.  पोलिसांनी जनतेला शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवेवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांचा वाढता देशद्रोह !  काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट !