‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाला विरोध होत असल्याने चित्रपटगृहांमध्ये अत्यंत थंड प्रतिसाद

‘चित्रपट पहाण्याची बळजोरी नाही’, असे पूर्वी म्हणार्‍या करीना खान यांच्याकडून आता चित्रपट पहाण्याचे आवाहन !

मुंबई – अभिनेते आमीर खान यांच्या नुकत्याच प्रदर्शिद झालेल्या‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाला विरोध होत असल्याने या चित्रपटातला संपूर्ण देशभरात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. अनेक प्रयोग रहित करण्यात आले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री करीना खान यांचीही भूमिका आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांतून केले जात होते. त्या वेळी करीना खान यांनी म्हटले होते की, ‘चित्रपट पहायचा नसेल, तर पाहू नका. कुणावर बळजोरी नाही;’ मात्र आता चित्रपटाला मिळालेला थंड प्रतिसाद पहाता त्यांनी जनतेला चित्रपट पहाण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कृपया या चित्रपटावर बहिष्कार घालू नये; कारण वास्तवमध्ये हा चित्रपट बहिष्कार घालण्यासारखा नाही. यावर लोकांनी श्रम घेतले आहेत. अडीच वर्षे २५० जण यासाठी काम करत होते.’

संपादकीय भूमिका

हिंदू संघटित झाले, तर काय होऊ शकते, त्याचे हे एक छोटेसे उदाहरण होय !