जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या घोषणा : चौघांना अटक

(‘सर तन से जुदा’, म्हणजे ‘शिर धडापासून वेगळे करणे’)

मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ च्या घोषणा

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथील करियांवा बाजारात मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून महंमद शकील, महंमद अब्दुल, महंमद जीशान आणि महंमद हारिस या चौघांना अटक केली आहे.