अमेरिकेचे अफगाणिस्तानातील आतंकवादी भागावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

काबुल – अल्-कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी याला अफगाणिस्तानात ठार मारल्यानंतर अमेरिकेने आता येथील गझनी प्रांतातील अंदारे क्षेत्रावरही क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. तालिबानने या घटनेसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले असले, तरी पत्रकार सुमैरा खान यांनी ट्वीट करून सांगितले की, ‘ड्रोन’द्वारे दागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांद्वारे आतंकवाद्यांच्या एका महत्त्वपूर्ण भागावर आक्रमण करण्यात आले आहे. अन्य एक पत्रकार मुश्ताक यूसुफजई यांनी तालिबानी सूत्रांचा संदर्भ देत या घटनेला दुजोरा दिला आहे.